मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपने मात्र या मुद्द्यावरून संजय राऊत यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत वैफल्यातून अनेक विसंगत विधाने केली आहेत. त्यांनी कंपाउंडरऐवजी एमडी डॉक्टरकडून औषधे घेऊन आपली मनस्थिती ठीक करावी, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
मुळात कर नाही, त्याला डर असायचे काही कारणच नाही. राऊत यांनी पुरावे द्यावेत व ईडीच्या नोटिशीला समर्पक उत्तरे द्यावीत. विनाकारण भाजपवर आरोप करण्याचे धंदे बंद करावेत, असेही भातखळकर यांनी सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडी पुढे आपले म्हणणे सादर करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला’
- इच्छा असूनही युवराजला सय्यद मुश्ताक अली टी २० मध्ये संधी नाही
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान – बाळासाहेब थोरात
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

