🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत.
या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.
कोरोनाचा नवीन स्ट्रेन जगातील सोळा देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले. या प्रकारचा व्हायरसचा प्रसार वेगानं होत असल्याची माहिती समोर आली. यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ होते तोच कोरोनाचा आणखी दुसरा प्रकारही ब्रिटनमध्ये आढळून आला.
अखेर त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तोपर्यंत नव्या स्ट्रेनचा हा व्हायरस जगातील सोळा देशांमध्ये पोहोचला आहे. ब्रिटनसह स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलंड, डेन्मार्क, नेदरलँड्स, जर्मनी या देशात पोहोचलाय. नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळून आला होता. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डिसेंबरमध्ये ब्रिटनध्ये लॉकडाऊन घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर ब्रिटनहून विविध देशांत गेलेल्या अनेकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार- संजय राऊत
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी
- सोनूच्या ‘आय एम नॉट मसिहा’ पुस्तकाला मांजरेकरांच्या मुलीने दिल्या शुभेच्या!
- ‘समृद्धी महामार्गालगतच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
