🕒 1 min read
बीड : सध्या प्रत्येक क्षेत्रात वाढती स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मर्यादित नोकरीच्या संधीही आहेत. यामुळे प्रत्येक तरुणाला नोकरी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालता तरुणांनी व्यवसायात उतरावे असे आवाहन माजी मंत्री तथा शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे भेट दिली असता यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती अरुण डाके, विलास बडगे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सह आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी क्षीरसागर म्हणाले की, सध्याचा तरुण नोकरीच्या शोधात आहे. पण नोकरी मिळत नाही. सध्या सर्वांना नोकऱ्या मिळणे शक्य वाटत नाहीय नोकरी मिळत नसल्याने तरुण दिशाहीन होत असून वेळ आणि पैसा खर्च करत आहे. यामुळे कुंटुंबाचेही नुकसान होत असून आर्थिक संकट पाठ सोडायला तयार नाही. याचा विचार तरुणांनी करुन छोटा मोठा व्यवसाय करुन बेकारीवर मात करावी असे मार्गदर्शन केले.
महत्वाच्या बातम्या
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली म्हणून पदयात्रा
- माझ्या वडिलांनी ऊस तोडला, मजुरांच्या व्यथा मी जाणतो-धनंजय मुंडे
- कोरोनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम थांबवली
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू

