🕒 1 min read
मुंबई : भाजपचे नेते अतुल भातखळकरांनी शिवसेनेवर जोरदार आक्रमक टीका केली आहे. अतुल भातखळकर म्हणाले, “महाविकास आघाडीला आघाडीचा प्रस्ताव एमआयएमने दिला आहे. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात याला काही अर्थ नाही. एमआयएम शिवसेनेसोबत आघाडीचा प्रस्ताव देते यातच शिवसेनेचं खरं स्वरुप उघड झालं आहे. असे बोलत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
तसेच अतुल भातखळकर म्हणाले, “ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची तथाकथित सेक्युलर नव शिवसेना आहे. ही शिवसेना राहिली नसून हिरवी सेना झाली आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर मुस्लिम लांगूलचालन करण्यात शिवसेना अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांनी एमआयएमशी आघाडी केली काय आणि नाही केली काय आता एमआयएम आणि शिवसेनेत गुणात्मक दृष्ट्या काही फरक राहिलेला नाही”, अशी टीका मीडियाशी बोलताना भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली.
यासह अतुल भातखळकर म्हणाले, आजही औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. त्या शिवसेनेकडून दुसरी अपेक्षा काय करणार? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
