नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत तसेच कोरोनाचे निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिला होता. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या गेल्या आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबरला मतदान होईल तर लगेच दुसऱ्या दिवशी ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाची हाक दिली होती. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता.
मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर दिले नव्हते. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. दरम्यान आता नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या आढावा बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ आणि पंचायत समितीच्या ३१ जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या १२ सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत.
तर या निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळणार असल्याचे चित्र सध्या तरी पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- EDच्या आरोपपत्रात सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप पण अनिल देशमुखांचे नावच नाही
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी


