Share

उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Published On: 

मुंबई : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपाने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ३०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरू केली असल्याची पहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेसने देखील आता हि निवडणूक अस्तित्वाची केली असल्याचे पहायला मिळत आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणात वर्चस्व राखणारा काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने या निवडणुकीत छाप पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये वर्षा गायकवाड यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या समितीमध्ये प्रियंका गांधी, अजय कुमार लल्लू, आराधना मिश्रा मोना, आणि उत्तर प्रदेशमधील सर्व सचिव, प्रभारींचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान आता उत्तरप्रदेशच्या निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने देखील कंबर कसली असल्याचे पहायला मिळत आहे. काल आम आदमी पार्टीने देखील याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. पत्रकारपरिषदेत याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. जर आम आदमी पार्टीचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले, तर राज्यातील जनतेला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!