Share

EDच्या आरोपपत्रात सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप पण अनिल देशमुखांचे नावच नाही

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’ने देखील चौकशी सुरू केली. त्याअंतर्गत अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केली आहे.

दरम्यान आता अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचचं नाव नसल्याची माहिती समोर येतेय. अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचं कारण ईडीचे अधिकारी याबाबत खाजगीत बोलताना देत आहेत. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझेंसह देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईच्या बारमालकाने हे आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!