Share

“कुणाच्या तरी पाठबळानं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर…”, संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार परिसरातील घराबाहेर जाम ठोकला आहे. तर राज्याच्या सुख शांतीसाठी आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कुणाच्या तरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल मुंबईत येऊन तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाल सांगू नका, सरकारने काय केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे हे सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही. तुम्ही कोण आहात? काय लायकी तुमची? आम्हाला धमक्या देऊ नका. शिवसैनिकांवर आता कुणाचाही कंट्रोल नाही. दोन दिवसांत झालेल्या घटना या फक्त शिवसैनिकांच्या मनातील भावना नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रोष आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले की, “त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी, दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करू नये. त्यांना फारच धर्मा बद्दल आवड असले तर त्यांनी अमरावतीमध्ये आपल्या घरी शांततीत याचे वाचन करावे. मातोश्रीवर जाऊन तिथे विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!