Share

“गृहमंत्री वळसे पाटलांनी आम्हाला शिकवू नये…”, नवनीत राणांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आज (२३ एप्रिल) हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. यावरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया देत ‘त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी, दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करू नये’, असे म्हटले आहे. यावरच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“गृहमंत्री वळसे पाटलांनी आम्हाला शिकवू नये. हनुमानाला तुम्ही विचारत नाही आणि अयोध्येत जाऊन तुम्ही काय बोलणार आहात? गृहमंत्र्यांनी आम्हाला काय करायचं ते शिकवू नये. राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा गंभीर झालेल्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावं. हनुमान चालीसा आम्ही मातोश्रीच्या बाहेर म्हणणार होतो, मातोश्रीच्या आत नव्हे!”, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले गृहमंत्री वळसे पाटील?

“त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी, दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करू नये. त्यांना फारच धर्मा बद्दल आवड असले तर त्यांनी अमरावतीमध्ये आपल्या घरी शांततीत याचे वाचन करावे. मातोश्रीवर जाऊन तिथे विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये.”, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

तसेच पोलिसांना काय करायचे आहे, हे त्यांना माहित आहे. पोलिसांना योग्य कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या संपर्कात असून परिस्थिती बिघडली असे दाखवण्यात येऊ नये. राणांनी कुणाची तरी सुपारी घेतल्याचे दिसून येत आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून हे चालले आहे. मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर या मागील कारण राणा दाम्पत्य असणार. असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!