🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) हल्ला केला. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावरच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“भाजप युवा नेते मोहित कंबोज यांच्यावर शिवसेनेच्या गुंडांकडून झालेला हल्ला हा सत्तेचा माज प्रदर्शित करणारा आहे.सत्तेच्या जीवावर भाजप नेत्यांवर जीवघेणे हल्ले पचवण्याचा यांचा डाव दिसतोय . मी या हल्ल्याचा निषेध करतो. मुंबई पोलिसांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी.”, अशी मागणीही राम सातपुते यांनी केली आहे.
भाजपा युवा नेते @mohitbharatiya_ यांच्यावर शिवसेनेच्या गुंडांकडून झालेला हल्ला हा सत्तेचा माज प्रदर्शित करणारा आहे.सत्तेच्या जीवावर भाजपा नेत्यांवर जीवघेणे हल्ले पचवण्याचा यांचा डाव दिसतोय . मी या हल्ल्याचा निषेध करतो. @CPMumbaiPolice यांनी तात्काळ कारवाई करावी . @Dev_Fadnavis
— Ram Satpute (@RamVSatpute) April 23, 2022
दरम्यान मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र भाजपकडून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “गृहमंत्री वळसे पाटलांनी आम्हाला शिकवू नये…”, नवनीत राणांचे प्रत्युत्तर
- “कुणाच्या तरी पाठबळानं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर…”, संजय राऊतांचा राणा दांपत्याला इशारा
- “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे शिवसैनिक असते तर…”, रवी राणांचा शिवसेनेला टोला
- राणांनी कुणाची तरी सुपारी घेतली असेल- दिलीप वळसे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
