Share

‘शिवसेना ही काँग्रेस अलायन्स होऊ शकत नाही’, ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान करत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे. दरम्यान यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनंत गितेंच्या एका लाईनला आमचं समर्थन आहे. दुसऱ्या लाईनला नाही. शिवसेना ही काँग्रेस अलायन्स होऊ शकत नाही. ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार महाविकास आघाडीचा हा एक प्रयोग आहे असं म्हणत अनंत गितेंच्या यांच्या एका वक्तव्याचे नाना पटोले यांनी समर्थन केले आहे. तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान अनंत गीते यांच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत तसेच विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तसेच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी वैफल्यग्रस्त भावनेतून हे वक्तव्य केलं असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!