Share

हायकमांडने लक्ष घातल्यानंतरही वाद थांबेना,पंजाब कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरूच

Published On: 

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात जोरदार शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर आहे.

दरम्यान, आता या शीतयुद्धाचा भडका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थकांमध्ये आता पोस्टर वॉर सुरू झाले आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये दुफळी माजत चालली आहे. पतियाळासह अनेक शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावत अमरिंदर सिंग समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले होते आता सिद्धू समर्थकांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज अमृतसरसह आणखी काही शहरांमध्ये लावत सिधू समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले आहे. सर्व पंजाब सिद्धू यांच्यासमवेत असे पोस्टरमध्ये लिहलेले आहे.दरम्यान, या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद दिल्लीपर्यंत देखील पोहचला होता. यानंतर वादामध्ये हायकमांडला देखील हस्तक्षेप करावा लागला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर फेटाळून लावली आहे. तर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर यांच्यासोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!