मुंबई : शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता, आता भाजपकडूनही धनंजय महाडिक यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत घोडेबाजार होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीत भाजपकडून घोडेबाजार केला जाणार, असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे ‘घोडेबाजार भाजपला ही नको वाटत असेल तर त्यांनी अर्ज मागे घ्यावा. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
“भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला देखील कमी पडतात, परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही. त्यामुळे घोडेबाजार कोणी करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही, असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
यावर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, “मला वाटत नाही की, घोडेबाजार होईल. प्रत्येक माणूस निवडणुकीच्या आधी आपण हरणार असे बोलत नाही. ही निवडणूक आहे अपक्ष कुणाच्या बाजूने आहेत, हे निकाल आल्यावरच कळेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

