Share

Arvind Sawant | सातत्याने वाईट भाषेत बोलणारे भोंगे भाजपला मान्य आहेत का? – अरविंद सावंत

Published On: 

मुंबई : एकीकडे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पुढची भूमिका कशी असेल? यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी याबद्दल माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अरविंद सावंत यांनी बंडखोरांवर घणाघाती टीका केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत. त्यांच्याविरोधीत असंतोष आहे. तो असंतोष दाबण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सावंत यांनी केला. राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे. जाती-जातींमध्ये दुही माजवण्याचे काम त्यांनी केले. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा झाकण्याचा प्रयत्न झाला. ती महत्त्वाची बातमी झाकली गेली. सातत्याने काही भोंगे बोलतात. वाईट भाषेत बोलतात, ते भाजपला मान्य आहे, असे समजायचे का? यावर संजय राऊत साहेब प्रचंड हल्ले करीत होते. आम्हालाही या बाबत प्रतिहल्ले करता येतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!