🕒 1 min read
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांचे शहरावर विशेष लक्ष असून पालकमंत्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास झपाट्याने होत असून विकास विविध विकास योजनांच्या माध्यमातून शहर गतीने पुढे जात आहे. याबरोबरच शिवसेना एक सामाजिक संघटना सुद्धा आहे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसैनिक दिवस-रात्र न पाहता धावून जात असतो. गरज पडल्यास अर्ध्या रात्री धावून येणारा हा शिवसैनिकच आहे. हे जनतेलाही आता कळून चुकले आहे. असे प्रतिपादन आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी शिवसंवाद मोहिमेदरम्यान केले.
पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास व नगररचना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे जनतेचा शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी विकास आणि समाजसेवा याचा योग्य समन्वय साधून घराघरात शिवसैनिक तयार करण्याचा संकल्प करा असे आवाहन शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले. औरंगाबाद पूर्व मध्ये शिवसंवाद मोहिमे निमित्त आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मागील १५ दिवसापासून जिल्ह्यात शिवसंवाद मोहीम सुरू आहे.
नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, पक्षाचे कार्य करत असताना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे, लोकप्रतिनिधींनी मार्फत होणारी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून आमदार दानवे यांनी शहरातील गणेशनगर, अविष्कार कॉलनी, शहाबाजार, मकसुद कॉलनी, कैसर कॉलनी, संजय नगर, खास गेट, शिवनेरी कॉलनी, आयोध्यानगर, इंदिरानगर पूर्व-पश्चिम, बायजीपुरा, इंदिरा नगर बायजीपुरा-उत्तर, एन ६ सिडको, गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर, किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्त्मश कॉलनी, रोशन गेट, बारी कॉलनी, नवाबपुरा, भवानीनगर, सुरानानगर या विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
-
“आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही”, राजेश टोपेंचे वक्तव्य
-
औरंगाबादच्या पाटलांचा महाराष्ट्रात धुरळा; म्हणे महापालिका निवडणुकीसाठी ‘उमेदवार बायको’ पाहिजे!
-
सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का? संजय राऊतांचे टीकास्त्र
-
शिंगांच्या तस्करीसाठी होणाऱ्या गेंड्यांच्या हत्येवर मोदींनी जाहीर केली नाराजी; म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
