Share

“आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही”, राजेश टोपेंचे वक्तव्य

Published On: 

सोलापूर  : राज्यात वाईनसंबंधी निर्णयावरून चांगलेच वातावरण तापले आहे. राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये (Wine sales in supermarkets)देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र राज्यसरकारच्या या निर्णयावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा ठाकरे सरकारचा घाट असल्याचेही भाजपने म्हटले आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी या वादावर आपली प्रतक्रिया दिली आहे.

“आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही आणि म्हणणारही नाही. मद्यपानाला आरोग्यविभाग कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही. सिगारेटवरही धोक्याची सूचना असतेच. त्यामुळे जगात अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात”, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान भापकडून जरी वाईनला विरोध केला जात असला तरी, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दारू आणि वाईनमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने दारू आणि वाईनमधला फरक समजून घ्यावा. असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!