Share

बोर्डाच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आल्याने पुन्हा एकदा कडक निर्बंध आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शाळा बंदच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राला देखील या कोरोनामुळे चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भविष्याची चिंता देखील सतावत आहे. आता बोर्डाच्या परीक्षांबाबत (Maharashtra Board Exams) देखील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या की, राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतोय. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, अकरावीचे अॅडमिशन ऑनलाईन व्हावं अशा आमच्या अपेक्षा आहेत. पुढचं वर्ष विद्यार्थ्यांचं वेळेत सुरु व्हायला हवं, हिच अपेक्षा. पंधरा तारखेपर्यंत आढावा घेऊन भूमिका ठरवू. तसेच, शिक्षक संघटना, शिक्षणतज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवू, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!