🕒 1 min read
पणजी: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केला होता. आता यावरच संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे. तसेच कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का? अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का? असा संतप्त सवालही संजय राऊत केला आहे.
देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या नेत्यांची मुलं आहेत ते काय वांद्र्याच्या रस्त्यावर किंवा पेडररोडच्या रस्त्यावर स्टॉल टाकणार आहेत की डान्सबार टाकणार आहेत? भाजपने हे धंदे बंद करावेत. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाला संस्कार आणि परंपरा आहे. तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुलं काय करतात ते पाहा. आमची मुलं ड्रग्स विकत नाही. किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे, अशी संतप्त प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शिंगांच्या तस्करीसाठी होणाऱ्या गेंड्यांच्या हत्येवर मोदींनी जाहीर केली नाराजी; म्हणाले..
- यूपीत शिवसेनेच्या सात उमेदवारांचे अर्ज बाद; संजय राऊत म्हणाले, कुणाला तरी…
- ‘एवढंच राहिलं होतं, देवालाही त्यांनी…’; जितेंद्र आव्हाडांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका
- “कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल”, आरोग्यमंत्र्यांची माहिती
- राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांकडून विरोध; आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
