पुणे : महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी तिथीनुसार जयंती मोठ्या उत्सव दिमाखात साजरी साजरी झाली. राज्यात सर्वत्र शिवमय वातावरणात ‘जय भवानी… जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याचप्रमाणे पुण्यातील कोथरूड येथे 12 गणेश मंडळांनी एकत्र येत शिवजयंती सोहळा साजरा केला. आपापसातील मतभेद बाजूला सारून फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाखाली हे गणेश मंडळे एकत्रित येत, छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करून एकत्रित मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी या पालखी सोहळ्यात जय श्रीराम तरुण मंडळ, बाल शिवाजी मित्र मंडळ, बाल मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ, विश्वशांती मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, अमरज्योत मित्र मंडळ, मराठा मित्र मंडळ, नवजवान मित्र मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, येळकोट सेवा प्रतिष्ठान या सर्व गणेश मंडळांनी एकत्रित येत शिवजयंती साजरा केली.
दरम्यान, मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात शिवभक्त पारंपारिक वेशात सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशात शिवरायांची आरती देखील केली. या भागातील सार्वजनिक मंडळांतर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

