Uddhav Thackeray | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपुर्वी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी ते ज्योतिषांकडे गेले होते. यावरुन अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच, सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला कमाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. याचपार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.
यावेळी, हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नसल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतःचा हात दाखवायला गेले होते. आज ते कामाख्या देवीचा नवस फेडायला गेले आहेत. ज्यांना स्वतःचे भविष्य माहित नाही, ते आपलं काय भविष्य ठरविणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
यादरम्यान, मुख्यमंत्र्यांची हात की सफाई आम्ही पाहिलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राने ती पाहिलेली असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. तुमचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला कशाला विचारता, ते भविष्य, तुमचे माय-बाप दिल्लीत बसले आहेत, त्यांच्या हाती आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
दरम्यान, शिंदे सरकारमागे दिल्लीश्वराचा हात आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर राज्य सरकारचा कारभार सुरु आहे, असा आरोप ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू…”, सुषमा अंधारे संतापल्या
- Eknath Shinde | “फ्रिजच काय कंटेनरमधले खोके…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- Sambhajiraje Bhosale | “…तर उठाव होणारच”, संभाजीराजे भोसले कडाडले
- Sanjay Raut | संजय राऊत यांचं संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांना आवाहन, म्हणाले…
- Abdul Sattar | “मी नाराज नाही…”, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण


