🕒 1 min read
मुंबई : एका बाजूला कोरोनामुळे देशातील सवर्सामान्य जनतेची आर्थिक घडी बिघडली असताना दुसऱ्या बाजूला देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.
राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहेत. काल सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.
नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमत एका लिटरला 80 रुपयांच्या वर गेली आहे. परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक 91.95 रुपये आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 89 रूपये 52 पैसे, तर डिझेलचा दर 79 रूपये 66 पैसे इतका झाला आहे. सार्वजनिक कंपन्यांनी केलेली दरवाढ संपूर्ण देशात लागू होते. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) भिन्न दरांमुळे राज्याराज्यांत इंधन दर वेगवेगळे आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !
- दोन दिवसांचं अधिवेशन : कोरोनाचं कारण सांगून सरकार वेळकाढूपणा करत आहे; शिरोळेंचा आरोप
- शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

