Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत भाजप (BJP) पक्षासोबत युती केली. तरी सुद्धा भाजप (BJP) आणि शिंदे गटामध्ये (Eknath Shinde) फोडोफोडीचं राजकारण सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी हे राजकारण बंद करुन एकत्र काम करण्याचा आदेश दिला होता. मात्र, हे आदेश धुडाकावून लावत दोन्ही पक्षात अजूनही राजकारण सुरच आहे. अशातच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजप पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात ‘या’ भाजप महामंत्र्याचा प्रवेश –
शिंदे गटाने मुंबईतील भाजपचा महामंत्री फोडला असून भाजप पक्षाचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव या दोघांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्वाची मानली जाते.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. शिंदे गटात राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी नाव न घेता आमदार मनीषा चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंड मागे देखील भाजप पक्षाचा कट असल्याचा आरोप विरोधक करतात. अशातच, बुलडाणा वरुन आलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, शिवसेना संपवायची या हेतूने सगळं करण्यात आलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “शिवसेनेचं नाव, चिन्ह गोठवलं, तरी पळालात!”, उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका
- Corona Alert | सण तोंडावर आलेले असताना राज्य सरकारकडून करोना वाढीचा इशारा!
- Shivsena । अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेने सामन्यातून मानले आभार
- BJP | “कही पे निगाहे कही पे निशाणा…”, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं प्रत्युत्तर
- Kishori Pednekar | पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल, “तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो?”


