नागपूर : राज्यामध्ये सध्या निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. राज्यातील सर्व पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळतं. याकाळातच अनेक नेते पक्षांतर करत असतात. याच पार्श्वभूमिवर काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेस पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली होती. पटोलेंच्या याच वक्तव्याला भाजप पक्षाचे नेते संजय कुटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय कुटे ?
काही दिवसांनी नाना पटोलेच भाजपमध्ये येतील असा दावा संजय कुटे यांनी केला आहे. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नसल्याचं म्हणत संजय कुटे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, नाना पटोले यांची नितीन गडकरींबद्दल बोलण्याची कुवत नाही. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपात येतील. पटोले यांनी यापूर्वीच भाजप दर्शन घेतले आहे. ते सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत असतात. त्यामुळे भविष्यात ते भाजपमध्ये येऊ शकतात. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही.
दरम्यान, नाना पटोले यांनी गडकरी यांना काँग्रेस पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेस हा लोकशाही माननारा पक्ष आहे. त्यामुळे गडकरी यांची भाजपामध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून घेतल्यावर तरी भाजपचा आत्मा शांत होईल असे वाटले होते; पण…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Navneet Rana | नवनीत राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
- Aditya Thackeray । कदम पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे घेणार समाचार; दापोलीत १६ सप्टेंबरला ‘निष्ठा यात्रा’
- Ajit Pawar | आजित पवार पुन्हा नाराज! दोन वेळा सभागृह सोडून गेल्याने चर्चेंना उधाण
- Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

