Share

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावर बॉलीवूडला वेड लावणाऱ्या शिल्पा शेट्टीचे ४७ व्या वर्षात पदार्पण

Published On: 

मुंबई : ९० च्या दशकापासुन बॉलीवूडवर आपल्या सौदंर्याची मोहीणी टाकणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज ८ जुन रोजी वाढदिवस. शाहरुख खान अभिनीत बाजीगर चित्रपटाद्वारे पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात शिल्पाला फिल्मफेअरची दोन नामांकने मिळाली. यानंतर पुढच्याच वर्षी अक्षय कुमार अभिनीत ‘मै खिलाडी तु अनाडी’ या चित्रपटाने शिल्पाने बॉलवूडमध्ये आपला जम बसवला. या चित्रपटातील ‘चुरा के दिल मेरा’ या गिताने लावलेले वेड आजही कायम आहे.

या चित्रपटानंतर शिल्पाने कधीच मागे वळुन नाही. यानंतर शिल्पा शेट्टीने गोवींदा सोबत द गॅम्बलर, हथकडी, छोटे सरकार, परदेसी बाबु यासारखे यशस्वी चित्रपट दिले. यासोबत शिल्पाने अनेक अभिनेत्यासोबत काम करत राहिली यात तिची सर्वात जास्त जोडी ही अक्षय कुमार सोबत जमली. त्याकाळात त्या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु आहे अशी चर्चा सुरु होती. मात्र काही काळानंतर अक्षय कुमारने ट्विकंल खन्नाशी लग्न केले आणि त्यांचे प्रेम प्रकरण संपुष्टात आले.

२००० साली आलेला धडकन हा तिचा अक्षय कुमारसोबतचा अखेरचा चित्रपट. हा चित्रपट तुफान चालला. यानंतर शिल्पा शेट्टीने पारंपारीक भूमिकेला तडा देत फिर मिलेंगे या चित्रपटात एड्स ग्रस्त महिलेची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी शिल्पाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ते नामांकन मिळाले. २००७ साली आलेल्या अपने नंतर शिल्पाने चित्रपटातुन ब्रेक घेतला. यानंतर शिल्पाने उद्योजक राज कुंद्रा यांच्याशी लग्न केले. यानंतर शिल्पा अनेक रियालीटी शोच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. हंगामा २ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!