Share

आर अश्विन आणि संजय मांजरेकर यांच्यात रंगले ट्विटरवॉर

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वी संजय मांजरेकरांनी सर्वकालीन क्रिकेटपटुची एक यादी सांगितली. या यादीत डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट या क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला. मात्र त्यावेळी मांजरेकरानी अश्विनचा समावेश सर्वोत्तम क्रिकेटपटुच्या यादीत करण्यास साफपणे नकार दिला. यानंतर आर अश्विनने मांजरेकरच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

काही दिवसापुर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी अश्विनला वर्तमान काळातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे म्हटले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी असहमती दर्शवली. संजय मांजरेकरानी एक ट्विट करत म्हणले की,’ एखाद्या खेळाडुला सर्वकालीन सर्वोत्तम म्हणने ही खुप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट यासारखे क्रिकेटपटू सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत येतात. पण मी आदरपूर्वक सांगु इच्छीतो की अश्विन अजून सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडुंच्या यादीत नाही.’

मांजरेकराच्या या ट्विटला उत्तर देताना आर अश्विनने अपरिचीत या चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर तमीळ भाषेत ‘अपडी सोलधा दा चारी, मानसेल्लम वल्लीकिरधू’ असे लीहीले होते. याचा अर्थ ‘असे बोलु नका वाईट वाटते’ असा होतो. अश्विनच्या या उत्तराचे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे. मांजरेकरानी एका मुलाखतीत अश्विनने आशियाबाहेरील देशात एकदाही ५ गडी बाद केले नसल्याने आपण त्याला सर्वोत्तम समजत नाही असे म्हणाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!