🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा अर्ध्यातच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर या स्पर्धेदरम्यान कोरनाची लागण झालेला संदिप वॉरीयर याने नुकताच त्याचा एक किस्सा शेअर केला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान बायोबबलमध्ये राहत असल्याने कुटुंबाशी फोनवर संपर्क ठेवावा लागत होता. यावेळी संदिप वॉरीयर म्हणाला की, ‘जेव्हा माझी पहिली चाचणी निगेटिव्ह आली तेव्हा मी पत्नीला व्हिडीओ कॉल केला तेव्हा पत्नीने चेहरा पाहताच तुझी पुढील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटिव्ह येईल’ आणि घडलेही अगदी तसेच यानंतर केलेल्या चाचणीत संदिपचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला. वॉरियरची पत्नी आरती ही डॉक्टर असून, काही महिन्यापूर्वी तीला पण कोरोनाची लागण झाली होती.
आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापर्वी कोलकाता नाइट रायडर्सचे संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती या दोन खेळाडू सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली होती. बायोबबल सारखी कडक उपाययोजना करुन सुद्धा आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. या दोघांनतर स्पर्धेत सहभागी काही खेळाडू आणि काही प्रशिक्षक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सुबोध कुमार जयस्वाल CBI संचालक झाल्याने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार?
- ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात ‘रुपय्या’ गाण्याची गायिका आर्थिक संकटात
- ‘द फॅमिली मॅन -२ ‘ वेब सीरिजला तमिळनाडू सरकारकडूनही बंदी घालण्याची मागणी
- धक्कादायक ; आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची रोकड, एसीबीची कारवाई
- गिरीश कुबेर यांनी हे धाडस कोणाच्या जीवावर केले याची माहिती मिळाली पाहिजे : नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
