Share

शिवसेनेचे तब्बल १७ उमेदवार बाद, तर राष्ट्रवादीचा एकहाती विजय निश्चित; राजकीय गोटात खळबळ

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.

अशातच, उस्मानाबादमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेच्या पॅनलच्या १७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. १९ पैकी १७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यामुळे शिवसेनेच्या पॅनलला निवडणुकीआधीच पराभव पत्करावा लागला आहे. हा प्रकार बलसूर गावातील आहे. यामुळे हे गाव आता चर्चेचे केंद्र बनले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या बलसूर गावात हा प्रकार समोर आला आहे. ऐनवेळी १७ उमेदवारांचा अर्ज बाद ठरल्याने त्यांची मोठी तारांबळ झाली. यासंदर्भात न्यायालयाचे दार देखील ठोठावण्यात आले आहे. एकूण ४३ अर्ज पाच प्रभागातील १५ जागांसाठी आले होते. यापैकी १७ अर्ज अवैध ठरल्याने नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

उमेदवारी अर्जावर अनुक्रमांक व प्रभाग क्रमांक चुकीचा देणे, साक्षीदार सही घेतली नसल्याचे कारण देत, त्याचबरोबर अपत्य स्वयंघोषणापत्र नसणे, अशिक्षित असल्याचे शपथपत्र न देणे, ठेकेदारी करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र नसणे, परिशिष्ट दोनची नोटरी नसल्याच्या कारणावरून हे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या गटाला झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या पॅनलचा एकहाती विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!