Share

‘आता NCPने डोळे वटारले, कुणीही यावे टपली मारून जावे अशी शिवसेनेची केविलवाणी स्थिती’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. अशातच आता राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.

आता, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामकरणास विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, ‘नामांतराचा प्रस्ताव आम्ही २० वर्षांपूर्वीच नाकारला होता. नाव बदलण्याने शहराचा विकास होतो असे आम्हाला नाही वाटत.’ तसेच, ‘नाव बदलणे हे आमच्या अजेंड्यात नसल्याचे’सांगत मलिक यांनी देखील थोरातांनी किमान सामान कार्यक्रमाची शिवसेनेला आठवण करून देत इशारा दिल्याचं एकप्रकारे समर्थन केलं आहे. त्यामुळे, शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

यावरूनच, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे. ‘शहरांची नावे बदलाण्यावरून आता NCP ने शिवसेनेवर डोळे वटारले… कुणीही यावे टपली मारून जावे अशी सत्ताधारी शिवसेनेची केविलवाणी स्थिती झाली आहे…’ असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!