🕒 1 min read
सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुद्धा होताना पहायला मिळाले. तद्पश्चात अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव-पाटील (Nitin Patil) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले(Shivendraraje Bhosle) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना शिंदे म्हणाले की,’मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. यापूर्वी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांकडे मीच शिफारस केली होती. परंतु यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत,’असा खोचक टोला शिंदेंनी लगावला आहे.
दरम्यान, माझ्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याची दखल राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींना घ्यावी लागली. परंतु ते करत असताना शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या कामाचे कौतुक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं आहे. आजपर्यंत या बँकेत शिवेंद्रराजे भोसलेंना जितका वेळ अध्यक्षपद दिलं तितका वेळ कुणाला मिळाला नसेल. त्यामुळे नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या १० वर
- …तरी केंद्रातील विद्यमान सत्ताधारी जीएसटीच्या प्रेमात आकंठ बुडालेत- संजय राऊत
- ‘ठाकरे सरकारचा जमीन घोटाळा’; किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
- आम्ही राजकारणी तुला काही देऊ शकलो नाही; सूर्यकांता पाटलांची भावूक पोस्ट
- सदाभाऊ खोत यांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, बिळातून बाहेर या आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
