Share

आम्ही राजकारणी तुला काही देऊ शकलो नाही; सूर्यकांता पाटलांची भावूक पोस्ट

Published On: 

जालना : शहरातील राष्ट्रवादीचे नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी सिनेट सदस्य डॉ. उल्हास उढाण यांचे आज पहाटे निधन झाले. (Ncp) ह्दयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राला धक्काच बसला. (Marathwada) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) नेते अजित पवार यांच्यासह सर्वच नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले उढाण हे विद्यार्थीप्रिय देखील होते.

त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि आता भाजपमध्ये असलेल्या सूर्यकांता पाटील यांना देखील उल्हास उढाण यांच्या निधनाने धक्का बसला आहे. पाटील यांनी आपल्या फेसबूकवरुन उढाण यांच्याबद्दलच्या भावना, आठवणी व्यक्त केल्या आहेत.

प्रिय उल्हास, हे असे जाणे अत्यंत क्लेशदाई आणि कधीच जखम भरून न येणारे आहे रे. किती आश्वासक होतास. तुला आम्ही राजकारणी काहीच देऊ शकलो नाही. याचा कायमचा व्रण आमच्या मनाव ठेऊन गेलास. आपले औरंगाबादेत भेटायचे ठरले होते. कायम कार्यरत असणाऱ्या तुला भेटायचे, बघायचे राहून गेले.

तुझ्या मनावर किती ओझे घेऊन तू मार्गक्रमण केलेस, याची मी साक्षीदार आहे. मराठवाड्यातील उत्तम नेता म्हणून मी तुझ्याकडे बघायची, पण दुर्दैवाने सगळ्यांचे हसत स्वागत करणाऱ्या तुला आम्ही काहीच देऊ शकलो नाही. एवढे दळभद्रे आम्ही कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू. तुझ्या घरावर कोसळलेल्या ह्या विजेने सगळे जाळून खाक झाले.

हे काही तुझे जाण्याचे वय नव्हते, पण तू गेलास आम्हाला कायमचे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून. छे हे भलतेच घडले भावा. तू आम्हाला एकटे केलेस. तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल.. तू वरतून आमच्याकडे बघून हसशील, तरी पण तुला विसरणे आम्हास शक्य होणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली ओम शांती । डॉक्टर उल्हास उढाण आमच्यात नाहीत, अशी भावूक पोस्ट सूर्यकांता पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!