नवी दिली : दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. राज्यात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी(६ डिसें.)ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
सोमवारी मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे २९ नोव्हें.ला आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे ३० नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे जनुकीय कर्मनिर्धारणादरम्यान स्पष्ट झाले.
दरम्यान, शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यानंतर पिंपरीतील सहा, पुण्यातील एक तसेच आळंदीतील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. आता अजून दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, सरकार अभ्यास करेल’
- शिवसेनेची भूमिका डबलढोलकीची; चंद्रकांत पाटलांची टीका
- ‘ठाकरे सरकारचा जमीन घोटाळा’; किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
- आम्ही राजकारणी तुला काही देऊ शकलो नाही; सूर्यकांता पाटलांची भावूक पोस्ट
- सदाभाऊ खोत यांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, बिळातून बाहेर या आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

