Share

परभणीत ‘महाबीज’ची राज्य बियाणे प्रयोगशाळा

Published On: 

परभणी : महाराष्ट्र शासनाने बियाणे अधिनियम, १९६६ नुसार महाबीजच्या परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून १ फेब्रुवारी २०२१ ला प्रसिध्द राजपत्रानुसार अधिसूचित केले आहे. महाबीजच्या अकोला येथील बीज परीक्षण प्रयोशाळेस राज्य शासनाने यापूर्वीच राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित केलेले आहे.

परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा, राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित झाल्यामुळे आता कोणत्याही अधिसूचित वाणाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या बियाण्याचे परीक्षण महामंडळाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत करता येईल.

तसेच शेतकरी बांधवांना, खासगी कंपन्यांना तसेच बीज प्रमाणीकरण यंत्रणेला बियाणे नमुन्यांचे बीज परीक्षण गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा परभणी येथे करता येईल. महामंडळाची प्रयोगशाळा ही राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित झाल्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना उच्चतम दर्जाचे गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास महाबीजचे अध्यक्ष तथा कृषी सचिव एकनाथ डवले आणि व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र पापळकर यांनी या वेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!