Share

‘शेतकऱ्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या’

Published On: 

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळ्यानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.

आता विरोधी पक्षातील खासदारांचं शिष्टमंडळ देखील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार होतं. मात्र, या शिष्टमंडळाला गाझीपूर बॉर्डरवर रोखण्यात आल्याचं समजत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत. यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र देखील सोडलं आहे. ‘हे सरकार अतिशय असंवेदनशील असून आम्हाला रोखणं हे धक्कादायक आहे असं त्या म्हणाल्या आहेत.

तर, ‘शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता दोन महिने झाले आहेत. तरीही त्यांना न्याय मिळत नाही. बॉर्डरवर देखील अशी स्थिती नाही. पाकिस्तान, चीन बॉर्डरला मी गेले आहे. तिथे ही अशी परिस्थिती नाही. मात्र, येथे अशी धक्कादायक परिस्थिती आहे. हे आमचे शेतकरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करु दिली जात नाही. त्यांना भेटू दिले जात नाही, याला काय म्हणावे ?,’ असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळेंच्या या टीकेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही ते कायदे मोदी सरकारने करून दाखवले. तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाजीपुर बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी जरूर जा परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या.’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!