मुंबई:- मुंबईतील फेरीवाल्यांकडून शिवसेना कार्यकर्त्यांनी वसुली सुरू केल्याचा आरोप स्थानिक फेरीवाल्यांनी केला आहे. एवढेच नाही तर या फेरीवाल्यांना वसुलीची पावती देखील शिवसेनेकडून दिली जात आहे. या पावतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनील राऊत, नगरसेवक उपेंद्र सावंत यांचे फोटो आहेत. तुम्ही आम्हाला पैसे द्या, महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हात लावणार नाही, पोलिसांना आम्ही मॅनेज करु, असे स्थानिक शिवसैनिकांकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.
दरम्यान, सर्वत्र ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी याप्रकरणी शिवसेना आणि विशेषकरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या चिंधी लोकांनी मुंबईला भकास केलं, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
ह्या लोकांना वर्गणीचोर उगाच म्हणत नाही, संज्या राऊतचा आमदार भाऊ फेरीवाल्यांकडून दिवसाचे १० रुपये घेतो. संज्या आता काही बोलणार नाही सरळ जाऊन २ दिवस लीलावती हॉस्पिटलमध्ये छाती दुखते म्हणून ऍडमिट होईल. या शिवसेनेच्या चिंन्दी लोकांनी मुंबईला भकास केलं. pic.twitter.com/H4jWf6MiVq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 4, 2021
‘ह्या लोकांना वर्गणीचोर उगाच म्हणत नाही, संज्या राऊतचा आमदार भाऊ फेरीवाल्यांकडून दिवसाचे १० रुपये घेतो. संज्या आता काही बोलणार नाही सरळ जाऊन २ दिवस लीलावती हॉस्पिटलमध्ये छाती दुखते म्हणून ऍडमिट होईल. या शिवसेनेच्या चिंधी लोकांनी मुंबईला भकास केलं’, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार ? अजित पवारांनी चर्चा धुडकावल्या !
- पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?
- पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक हवंच : छगन भुजबळ
- आरबीआयची आणखी एक कारवाई ! ‘या’ सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड !


