मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने कायदा महाराष्ट्र विधानमंडळाने तयार करावा अशा स्पष्ट सुचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी परवा दिल्या आहेत. नाना पटोले यांनी मतपत्रिकांबाबत सूचना केल्यानंतर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी देखील विविध प्रकरच्या प्रतिक्रिया यावर दिल्या होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. मतपत्रिकेशिवाय आणखी काही आधुनिक पर्याय असेल तर त्याचाही विचार केला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजितदादांनी ईव्हीएम आणि मतपत्रिकेशिवाय तिसऱ्या पर्यायाचा विचारही सूचवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिसऱ्या पर्यायाची भूमिका मांडली आहे. मतपत्रिकेने मतदान करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. त्यावर अजितदादांना त्यांची भूमिका विचारण्यात आली. “ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. काय सूचना करावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरी सरकारला सांगितले असले तरी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ त्यावर चर्चा करेल आणि पुढे कसे जायचे ते ठरवतील.
मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय अंतिम असेल असे सांगतानाच मशीनने पेपरलेस काम होते म्हणून तो पर्याय आला. परंतु देशाच्या लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका मशीनद्वारे होतात. इतर निवडणुकाही मशीनद्वारे होतात. मात्र त्यात कुणाला शंका वाटत असेल, त्रुटी राहिलेली दिसत असेल, नवीन तंत्रज्ञान आलेले असेल आणि त्यातून पारदर्शकता निर्माण करता येत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशन कार्ड रद्द
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- ‘पाकिस्तान, चीनच्या बॉर्डरवर देखील अशी परिस्थिती नाही’
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश


