Share

शर्जील उस्मानी आला, जबाब देऊन निघूनही गेला, सरकारने प्रत्यक्षात काय केले ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे,’ असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शर्जील उस्मानी याने केलं आहे. शर्जील उस्मानीने एल्गार परिषदेमध्ये केलेल्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला होता.

शर्जील उस्मानी याने बुधवारी दुपारी पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदवून तो निघूनही गेला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलेली आहे.

‘आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे.

‘मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी’ असे ट्वीट करून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!