मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात तब्बल १५ हजार ५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात आता तब्बल १ लाख ३० हजार ५४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर दा महाड चवदार तळे येथे गर्दी करू नका असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार ताळ्यावर केलेल्या पाण्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा यंदा 94 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी 20 मार्चला लाखो आंबेडकरी अनुयायी महाड चवदार तळे येथे एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी चवदार तळे येथे केलेल्या क्रांतीला अभिवादन करतात. यंदा मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंबेडकरी जनतेने येत्या दि.20 मार्च रोजी चवदार तळे येथे गर्दी करू नये’ असं ते म्हणाले आहेत.
देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत आहे.त्यामुळे यंदा चवदार तळे येथे आंबेडकरी जनतेने गर्दी करू नये.राज्यात सर्वांनीच गर्दी चे कार्यक्रम टाळावेत. तसेच, रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्र प्रदेश ची राज्य कार्यकारीणी ची महत्वपूर्ण बैठक येत्या दि.27 मार्च रोजी जळगाव मध्ये आयोजित केली होती मात्र वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भावामुळे दि.27 मार्च ची रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारीणीची बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेनं केला भाजपचा ‘टप्प्यात कार्यक्रम’; महापौर निवडणुकीआधी तब्बल ३० नगरसेवक शिवबंधनात !
- शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे – जयंत पाटील
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
