🕒 1 min read
मुंबई : राज्यात आज आणि उद्या विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- डेल्टा प्लस चा जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना बाजारपेठेवर वेळेचा निर्बंध का?? जिल्हा व्यापारी महासंघाचा आक्षेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
