Share

अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा न्युझीलंडने दारुण पराभव केला. या पराभवामुळे भारतीय चाहत्यामध्ये नाराजी होती. मात्र याच दौऱ्यावर भारतीय क्रिकेटपटु दिनेश कार्तिकने समालोचनाद्वारे चाहत्यांची मने जिंकली आहे.

डब्ल्युटीसी सामन्याव्यतीरिक्त इंग्लड आणि श्रीलंका मालिकेत समालोचनावेळी कार्तिकने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. समालोचनावेळी फलंदाजाच्या बॅटचा विषय निघाला असता कार्तिकने ‘अनेक फलंदाजाना स्वत:ची नव्हे तर दुसऱ्याची बॅट आवडत असते. कारण बॅट ही शेजारच्या पत्नीप्रमाणे असते, ती तुम्हाला नेहमीच प्रिय असते.’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा सबंध क्रिकेटप्रेमीनी मुरली विजयशी जोडला होता.

या वक्तव्यानंतर इंग्लंड श्रीलंका संघादरम्यान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कार्तिकने या वक्तव्याबद्दल माफी मागितली. तो म्हणाला की,’यापुर्वी झालेल्या सामन्यात जो प्रकार घडला त्याबद्दल मी माफी मागतो. मी जाणून बुजुन ते वक्तव्य केले नव्हते. पण माझी चुक झाली मी त्या चुकीबद्दल सर्वांची माफी मागतो. मी जे बोललो ते चुकीच होत’ असे कार्तिक समालोचनावेळी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!