Share

भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यावर नसलेल्या भारतीय संघाचे खेळाडू हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहे. श्रीलंका दौऱ्यावर दुय्यम संघ पाठवुन बीसीसीआयने श्रीलंकेचा अपमान केला असे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटु अर्जुना रणतुंगाने केली होती.

अर्जुना रंणतुंगाच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटु आणि समालोचक आकाश चोप्राने सडेतोड उत्तर दिले आहे. रणतुंगाला उत्तर देताना आकाश म्हणाला,’भारतीय संघात शमी, विराट, रोहित आणि बुमराह नाही म्हणून तुम्हाला हा संघ दुय्यम वाटतो. तुमच्या संघाविरुद्ध आमचा भारताचा संभाव्य संघ जर उभा केला तरीही अनुभवाचा विचार केला तरी तुमचा संघ कमीच पडेल.’ असे आकाश चोप्रा म्हणाला.

यावेळी पुढे बोलताना आकाश चोप्राने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेविषयी बोलताना म्हणाला की, ‘आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी तुम्हाला खेळावी लागणार आहे. कारण अफगाणिस्तान संघ विश्वचषकासाठी आधीच पात्र झाला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत तुम्हला याचा प्रत्यय येईलच.’ आकाश चोप्राच्या या वक्तव्यावर अर्जुना रणतुंगा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!