Share

शार्दुल ठाकूरने अश्विनला सांगितले गोलंदाजीचे रहस्य; पहा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ‘वॉक द टॉक’ शोमध्ये रविचंद्रन अश्विनशी (Ravichandran Ashwin) संवाद साधला याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

यावेळी अश्विनने ठाकूरला दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल विचारले, ज्यावर शार्दुलने सांगितले की, “मी या दौऱ्याचा खूप आनंद घेत आहे. इथून पुढे अनेक आठवणी माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत. माझा पहिला एकदिवसीय सामना येथे होता जिथे मी चार विकेट्स घेतल्या, तसेच मी येथे माझे टी-२० पदार्पण केले.” शार्दुल पुढे म्हणाला की, आज आमच्यासोबत जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर आणि आमचा आवडता कसोटी गोलंदाज आर अश्विन आहे. याशिवाय दोघांमध्ये बरीच चर्चा झाली.

यानंतर, शार्दुलने अश्विनच्या गोलंदाजीचे कौतुक केले. तसेच शार्दुल म्हणाला, आमचे शेवटचे दौरे खूप चांगले होते. या दौऱ्यातही आम्ही चांगली कामगिरी करू. पुढे अश्विनने शार्दुलला विचारले की, जेव्हाही तू मैदानात येतोस तेव्हा लोक तुझ्याकडून दोन विकेट घेण्याची अपेक्षा करतात. यावर शार्दुल म्हणाला की, मी माझ्या खेळाचे नियोजन करतो. मी फलंदाजांचे व्हिडिओ पाहून स्वत:ला तयार करतो. शार्दुल म्हणाला की, मी नेहमीच संघासाठी सामने जिंकण्यासाठी खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!