टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप – सेनेच्या वाटेवर आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ढेपाळला आहे. शरद पवारांच्या विश्वासातल्या नेत्यांनी पक्षाला राम राम केलाचं आहे, पण आता नातेवाईक ही पक्षांतर करत आहे. याच संदर्भात श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. पवारांनी पत्रकारावर संताप व्यक्त केला आणि पत्रकार परिषदेतून जाण्याची विनंती केली. शरद पवारांचा हा रुद्र अवतार सर्वांना अनपेक्षित होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवारांची राष्ट्रवादी ही फक्त महाराष्ट्रापुरती आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरती आणि त्यातही काही जिल्ह्यापुरती आहे. त्यामुळे चिडणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे कधी चिडत नाही की रागावत नाहीत. ते कायम आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कुठल्याही कठीण प्रश्नावर ते अगदी संयमाने कायम उत्तरं देतात. मात्र श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत हा समतोल ढासळताना दिसला.
दरम्यान शुक्रवारी झालेल्या श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार हे भडकले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. नेत्यांबरोबर नातेवाईक ही पक्षांतर करत आहेत, असा प्रश्न विचारला असता. शरद पवार संतापले. इथे नातेवाईकांचा काय संबंध आला असा प्रश्न विचारला. असे असभ्य प्रश्न विचारल्या बद्दल तुम्ही माफी मागा अशी मागणी शरद पवार यांनी केली. एक तर पत्रकार परिषदेला मला तरी बोलावत जाऊ नका अन्यथा अशा पत्रकारांना देखील बोलावू नका, असे पवार यावेळी म्हणाले.
- का चिडले शरद पवार ? सुप्रिया सुळे म्हणतात…
- मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला
- ‘झाला तर दिल्लीतचं होणार उदयनराजेंचा भाजप प्रवेश’
- ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात जिल्हा मागे राहू नये म्हणून भाजपमध्ये चाललोय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
