टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप – सेनेच्या वाटेवर आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ढेपाळला आहे. शरद पवारांच्या विश्वासातल्या नेत्यांनी पक्षाला राम राम केलाचं आहे, पण आता नातेवाईक ही पक्षांतर करत आहे. याच संदर्भात श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. पवारांनी पत्रकारावर संताप व्यक्त केला आणि पत्रकार परिषदेतून जाण्याची विनंती केली. शरद पवारांचा हा रुद्र अवतार सर्वांना अनपेक्षित होता. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुळे म्हणाल्या की, ५० वर्षात मी कधीही शरद पवार चिडलेले मी पाहिलेले नाही. पण जर एखाद्याला प्रश्नाचे उत्तर देयचे नसेल आणि वारंवार तेच प्रश्न विचारले जात असतील तर चिडणे स्वाभावीक आहे. या विषयावर मला बोलायचे नाही असे आधी सांगितल असेल आणि तुम्ही ५ वेळा एकचं प्रश्न विचारत असाल तर माणूस चिडू शकतो. कोणत्या प्रश्नाला उत्तर देयचे किंवा नाही देयचे याचा अधिकार आम्हाला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान शुक्रवारी झालेल्या श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार हे भडकले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. नेत्यांबरोबर नातेवाईक ही पक्षांतर करत आहेत, असा प्रश्न विचारला असता. शरद पवार संतापले. इथे नातेवाईकांचा काय संबंध आला असा प्रश्न विचारला. असे असभ्य प्रश्न विचारल्या बद्दल तुम्ही माफी मागा अशी मागणी शरद पवार यांनी केली. एक तर पत्रकार परिषदेला मला तरी बोलावत जाऊ नका अन्यथा अशा पत्रकारांना देखील बोलावू नका, असे पवार यावेळी म्हणाले.
- मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला
- ‘झाला तर दिल्लीतचं होणार उदयनराजेंचा भाजप प्रवेश’
- ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात जिल्हा मागे राहू नये म्हणून भाजपमध्ये चाललोय’
- आरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या ! बीडवासियांनी आरक्षणा विरोधातचं काढला मूकमोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
