🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. परमबीर सिंग यांच्यावतीने वकील विक्रम ननकानी तर डव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडली.
आजच्या या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी परमबीर सिंह यांनाच खडेबोल सुनावले आहेत. ‘तुम्ही पोलीस अधिकारी आहात. जेव्हा एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते तेव्हा एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते. मात्र, तुम्ही तसे का केला नाही ?’ असा सवाल देखील मुख्य न्यायमूर्तींनी केला आहे. तसेच,’ जर एखाद्या सामान्य माणसालाही एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते. परंतु पोलिस अधिकारी म्हणून गुन्हा घडतोय हे माहिती असूनही एफआयआर दाखल केलेला नाही, हे तुमचं अपयश आहे,’ असे खडेबोल देखील न्यायमूर्तीनी सुनावले.
एक माजी मुख्यमंत्री व एक माजी पोलीस आयुक्त
त्यांना FIR प्रोसिजर माहीत नव्हती?
मलबार हिल पोलिस स्टेशन डायरीत केसची साधी नोंद नाही.
कोर्टासमोर पुन्हा पोलिसांवरच जबाबदारी ढकलण्याचा अश्लाघ्य प्रकार!
यांना फक्त मीडिया ट्रायल चालवण्यातच इंटरेस्ट होता? #मनफडण_कहानियाँ— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 31, 2021
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने परमबीर सिंह यांच्यासह माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ‘एक माजी मुख्यमंत्री व एक माजी पोलीस आयुक्त त्यांना FIR प्रोसिजर माहीत नव्हती? मलबार हिल पोलिस स्टेशन डायरीत केसची साधी नोंद नाही. कोर्टासमोर पुन्हा पोलिसांवरच जबाबदारी ढकलण्याचा अश्लाघ्य प्रकार! यांना फक्त मीडिया ट्रायल चालवण्यातच इंटरेस्ट होता?’ असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पडेगावातील हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार! शहरात एकच खळबळ
- शरद पवारांच्या उत्तम आरोग्यासाठी कार्यकर्त्यांकडून राज्यभर होमहवन
- जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी 30 हजार पानांची याचिका
- ‘ “परमवीर” घोड्याचे रूपांतर “शरमवीर” मध्ये होऊन भक्तांची तोंडं काळी होण्यास सुरुवात झालीये’
- १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची मागणी; हायकोर्टात याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

