Share

पुणे महापालिकेचे ‘कोरोना कॉल सेंटर’ आता २४ तास उपलब्ध राहणार

Published On: 

🕒 1 min read

पुणे – गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, काल पुणे शहरात दिवसभरात ३ हजार २२६ करोनाबाधित वाढले असून, २७ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचबरोबर शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ६४ हजार ८८५ झाली आहे. याशिवाय आजपर्यंत ५ हजार २७० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान,कोरोना उचारांच्या संबंधीची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.पुणे शहरातील कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

कंट्रोलरुमचे काम आता तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरु राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना कधीही बेड्सबद्दलची माहीती मिळू शकणार आहे. शिवाय या अडचणीच्या काळात प्रत्येक नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी सर्व यंत्रणा सदैव सज्ज राहील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे .

पुणे शहरात रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी या हेतूने कॉल सेंटरचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. हे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन यातील हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. यात आधी ५ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते, ते आता दहापर्यंत वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कॉल कनेक्ट होण्यास अडचण निर्माण होणार नाही’, असेही मोहोळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!