अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच कोरोना संकटाच्या काळात निर्यात बंदी म्हणजे कोरोना पेक्षाही मोठे संकट असल्याचे सांगत यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार निश्चितपणे मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल दिली आहे.
कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. आज शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज असताना केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा दुर्दैवी आहे. असे मत आ.काळे यांनी व्यक्त केले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. राज्यातील सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी दिली आहे. कोरोना संकटाच्या काळात देखील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे, असे मत आ.काळे यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावलेल्या गडकरींना कोरोनाची लागण
- मराठा आरक्षणाला स्थगिती नंतर राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती…
- पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांनी टोचले कंगनाचे कान! म्हणाल्या…
- शनिशिंगणापूर येथे प्रशांत गडाख यांनी कोरोना बाधित रुग्णांशी साधला संवाद!
- कांद्याची निर्यात बंदी मागे घ्या, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

