मुंबई : २ दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील कंगनावर निशाणा साधत या प्रकरणात उडी घेतली. ” मुंबईने कंगनाला पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा सगळं काही मिळवून दिले. इंडस्ट्रीने तिला भरभरून दिले त्याच इंडस्ट्रीला ती दिवसभर शिव्या देते. काही निवडक लोकांमुळे अख्खी इंडस्ट्री कशी वाईट असू शकते. कंगणा जे काही बडबडते ते कोणत्याही नॉर्मल व्यक्तीला पटण्यासारखे नाहीत. आपल्याला ठरवायचे असते की कशा पद्धतीने बोलले जावे.” असा घणाघात साधला होता.
यावर कंगनाने देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर देत काही अश्लील शब्द देखील वापरले.” मी कोणत्याही पक्षाच्या तिकिट वा प्रसिद्धीसाठी केलं नसून माझं ऑफिस वा जीव या साठी पणाला लावायची मला गरज नाही. तसेच ज्या उर्मिलाने माझ्यावर टीका केली ती स्वतः खालच्या प्रतीच्या चित्रपटांची स्टार आहे” अशी टीका कंगनाने केल्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांनी केले उर्मिलाचे समर्थन!
https://twitter.com/MadhuriKanitkar/status/1306452353529200640
“लज्जास्पद आहे कंगना रनौत. मी सहसा कुणावर कधीच भाष्य करत नाही. पण एक स्त्री म्हणून हे मला खूप त्रास देणारे आहे” असे लिहित “आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी” असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी ट्विटरवर कंगनाची मुलाखत शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘पोलीस भरती म्हणजे मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम’ ; नितेश राणेंचा सरकारवर प्रहार
- मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार तत्पर, मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा
- पोलीस भरतीचा निर्णय… ही तर मराठा समाजाला चेतावणी! खासदार संभाजीराजे कडाडले
- संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावलेल्या गडकरींना कोरोनाची लागण
- मराठा आरक्षणाला स्थगिती नंतर राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

