Share

संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावलेल्या गडकरींना कोरोनाची लागण

Published On: 

नागपूर : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गडकरी यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मी स्वत: विलगीकरणात गेलो असून, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. गडकरी हे सोमवारी (ता.14) संसद अधिवेशनाला काही काळ उपस्थित होते आणि पहिल्याच रांगेत बसले होते. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे.

गडकरी यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गडकरी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मला अशक्तपणा जाणवत होता. माझ्या डॉक्टरांकडून याबाबत सल्ला घेतला. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थनांमुळे माझी प्रकृती व्यवस्थित आहे. मी स्वत: विलगीकरणात गेलो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घ्यावी, अशी विनंती आहे. त्यांनी कोरोनाविषयीच्या उपाययोजनांचे पालन करावे. सुरक्षित रहा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता गडकरी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाआधी खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. यात अनेक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना झालेल्या खासदारांना अधिवेशनात प्रवेश दिला जात नाही. गडकरी यांनी अधिवेशनला हजेरी लावल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नेत्यांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे आज 23 हजार 365 नवीन रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर आज कोरोनामुळे 474 जणांचा बळी गेला आहे. तसेच, 17 हजार 559 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता 11 लाख 21 हजार 221 झाला आहे. राज्यात कोरोनामुळे एकूण 30 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांवर पोचली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!