अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. संपूर्ण देश जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेस शेतकरी शेतामध्ये राबून अन्नधान्य पिकवत होता. आधीच हवालदिल असलेल्या शेतकर्यास केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घालून मोठी चपराक दिली आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तो लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना आल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेले निवेदन तहसीलदार वखारे यांनी स्वीकारले. यावेळी, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण, ज्ञानदेव वाफारे, संपतराव म्हस्के, उबेद शेख, नलिनी गायकवाड, जरिना पठाण, अज्जू शेख आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- पोलीस भरतीचा निर्णय… ही तर मराठा समाजाला चेतावणी! खासदार संभाजीराजे कडाडले
- संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावलेल्या गडकरींना कोरोनाची लागण
- मराठा आरक्षणाला स्थगिती नंतर राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती…
- पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांनी टोचले कंगनाचे कान! म्हणाल्या…
- शनिशिंगणापूर येथे प्रशांत गडाख यांनी कोरोना बाधित रुग्णांशी साधला संवाद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
