Share

शनिशिंगणापूर येथे प्रशांत गडाख यांनी कोरोना बाधित रुग्णांशी साधला संवाद!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला नगर शहर तसेच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नेवासा तालुक्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता ना.शंकरराव गडाख यांनी स्वतः पुढाकार घेत शनिशिंगणापूर येथे शनैश्वर ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता व रुग्णांना अधिक सुयोग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशांत गडाख यांनी नुकतीच शनिशिंगणापूर येथील कोविड सेंटरला भेट देत कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना आधार दिला.

प्रशांत गडाख यांनी कोविड सेंटरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सुर्यवंशी, डॉ.मोहसीन बागवान, डॉ.राजेंद्र कसबे व रुग्णालयाचे कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेतली. यामध्ये प्रशांत गडाख यांनी कोरोनाला सामोरे जातांना हॉस्पिटल प्रशासन व आरोग्य विभाग यांनी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या. आपण सर्व मिळून ही सेवा जबाबदारीने पार पाडू व कोरोनाशी सामना करू हा आशावाद सर्वांना दिला. तसेच अचानक एखादा रुग्ण अत्यावश्यक झाल्यास त्याला पुढील उपचारासाठी इतरत्र हलवेपर्यत त्याला जास्त दाबाने ऑक्सिजन मिळावा म्हणून ना.शंकरराव गडाख यांनी आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक मशीन मिळवून दिल्या असून त्या येत्या दोन दिवसात येथे टेक्निशियनसह कार्यान्वित होणार असल्याची माहिती प्रशांत गडाख यांनी यावेळी दिली.

युद्धभूमीवरील सैनिक युद्ध सुरू झाल्यावर रजेवर जात नाहीत तर ते संकटाशी लढतात हाच दृष्टिकोन डॉक्टरांनी स्वीकारला पाहिजे. कोविड योद्धा म्हणून लढले पाहिजे त्यासाठी आवश्यक असणारे पी.पी.ई किट व इतर सर्व साहित्य पुरवण्याची जबाबदारी प्रशासनामार्फत माझी आहे. डॉक्टरांचा उपयोग फक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी नसून त्यांना धैर्य व पाठबळ देणे हा पण आहे. रुग्णांना हाच आधार मिळावा म्हणून मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या भेटीला आलो आहे असे प्रशांत गडाख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!